Friday, August 26, 2011

होय मी शोधतोय

होय मी शोधतोय .....

टिळकांच्या भाषणांना फक्त स्पर्धांसाठी घोकतोय

पाठ करून गुळगुळीत झालेले विचार तोंडावर फेकतोय
होय मी शोधतोय
त्यांच्या लिखाणाइतकाच परखड आवाज मी शोधतोय
होय मी शोधतोय

गांधीजींच कर्तुत्व फक्त नोटांमध्ये मोजतोय

आणि त्याच नोटांसाठी वेळी स्वाभिमानही विकतोय
होय मी शोधतोय
त्यांच्या सत्याग्रहाइतक निर्धारी नेतृत्व मी शोधतोय
होय मी शोधतोय

विदेशी कंपन्यांच्या मस्टरवर आजही सही ठोकतोय

त्यांच्या प्रलोभनांना हसत हसत बळी पडतोय
होय मी शोधतोय
स्वदेशीचा पुरस्कार करणारे आदर्श मी शोधतोय
होय मी शोधतोय

इंग्रजांनी भ्रष्ट नेत्यांना आंदण दिलेलं स्वातंत्र्य उपभोगतोय

यथेच्च मुकामार खाल्यावर माझी मीच पाठ शेकतोय
होय मी शोधतोय
लोकशाहीचा खरा अर्थ मी संविधानात शोधतोय
होय मी शोधतोय

खुलेआम बोकाळलेला स्वैराचार तरी कुठे रोकतोय ?

क्रांतीच्या मशालीसाठी तेलाची भिक मागतोय
होय मी शोधतोय
गोळ्या छातीवर झेलणारी पोलादी मन मी शोधतोय
होय मी शोधतोय
- विशाल आपटे
सौजन्य - इतना क्यूँ सोते है हम - प्रसून जोशी

Saturday, August 20, 2011

भक्ती

भक्ती
भक्तीची तहान | देव अधिष्ठान |
दु:ख ते लहान | होत असे ||

मुखी राम नाही | मनी विष राही |

दुजे नीच पाही | अहंकारे ||

राम एक ध्यास | मनी त्याचा वास |

भक्तीचा सुवास | दरवळे ||

रूप ते नश्वर | काम क्रोध ज्वर |

स्मरावा ईश्वर | ब्रह्मानंदे ||

नामाचा उच्चार | मनाचा निर्धार |

आत्म्याचा उद्धार | करू शके ||

- विशाल आपटे


काही तुला बोलायचे

काही तुला बोलायचे काही मला सांगायचे
हसवायचे रडवायचे तरीही मना रीझवायचे || धृ ||

तुटतात धागे माझ्या मनीचे
सांगू कुणा मी जीवाच्या व्यथा
पानांप्रमाणे गळतात स्वप्ने
झाली तयांची सांगता
वाटे नव्याने फिरुनी उठावे
मनाने मनाला फसवायचे || ||

( चाल - एकाच या जन्मी जणू )

- विशाल आपटे

Monday, August 15, 2011

आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली .....

क्रांतिकारकांच्या क्षोर्याने छाती फुलून आली
केवळ पुण्यतिथीलाच हारांची आठवण झाली
इतिहासाची चळवळ केवळ पुस्तकांनाच कळाली
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ||

भ्रष्टाचाराने खाबुगीरीची वृत्ती चळाली
अण्णांच्या हाकेला साद लोकांची मिळाली
लोकपालात आघाडीची फोडणी जळाली
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ||

कसाब आणि अफजल ला ठेवले महाली
दयेचा अर्ज राष्ट्रपतींच्या हवाली
कायद्यातून शिक्षेची भीतीच पळाली
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ||

- विशाल आपटे

Saturday, July 23, 2011

माझी अंत्ययात्रा

माझी अंत्ययात्रा

माझ्या अंत्ययात्रेत तशी बरी गर्दी जमली होती
आयुष्याची गोळाबेरीज शून्यावरती थांबली होती

जी तोंड कधी थकली नाहीत मला शिव्या घालताना
त्यातून शब्दच फुटत नव्हते मी नसल्याचे सांगताना
ज्या हातांनी टाळ्या दिल्या हर एक मैच जिंकताना
आज तेच हात कापत होते माझी तिरडी बांधताना

मी शेवटी कायमचा शांत निजलो
फुलांनी, हारांनी, अबीर - बुक्यांनी सजलो
आयुष्यभर ज्यांसाठी झीज झीज झिजलो
आज त्यांच्या अश्रूंनी आकंठ भिजलो
माझ्यातून आज मीच बाहेर पडलो
हातून झालेल्या चुकांसाठी रडरड रडलो

आता
वेळ निघून गेली होती सार काही संपल होत
मरणाने आयुष्याला चहूकडून घेरल होत
एवढच काय तर नाक तोंड ही कणकेन डांबल होत
मन माझं शरीरापासून कायमच लांबल होत

काळाच
चक्र फिरत असत कुणीतरी मागे उरत असत
किती पेक्षा कसा जगलो यातच सगळ ठरत असत
किती पेक्षा कसा जगलो यातच सगळ ठरत असत ...

- विशाल आपटे

Wednesday, June 22, 2011

स्नुषा

स्नुषा

मोकळ्या केसांना मुक्त मानेवर रुळू दे

कपाळी कुंकू चार चौघांना कळू दे
पापण्यांचे पंख वर आकाशी उडू दे
क्षणाची उसंत तरी या डोळ्यांना मिळू दे

कोवळ्या उन्हात तू केस वाळवीत

उन्हाचे कवडसे थेट माझ्या दारात
केसांतून उडे पाणी भोवती हवेत
काय सांगू वेडे किती भिजलो मनात
मी तुला चोरून बघता हसशी गालात
नजरबंद मी उभा माझ्याच घरात

देवळास जाशी तू सकाळी दहास

वाटेतच उभा मी मुद्दाम चहास
घरातून देऊळ अवघ्या मिनिटांचा प्रवास
किती .... ओढ लागे माझ्या अधीर मनास

धीर करून मोठा तुला एकदा मी अडवले
मनातल्या स्पंदनाना शब्दांनी मढवले
स्वप्नांना अपेक्षांच्या खांद्यांवर चढवले
पण तुझ्या उत्तराने भर पावसात रडवले

पाऊस होता ते बरच झाल .....
पाऊस होता ते बरच झाल डोळ्यातलं पाणी मनातून व्हाल
घुसमट झाली विचारांची मन माझ मनातून भ्याल
माझ्या जीवाचे बघून हाल तुझ्या डोळ्यात पाणी का बर आल ?

नंतर एकदा दिसलीस दोन पावलं मागे हटलीस
तरीही मला तितकीच जवळची वाटलीस
अचानक जवळ येऊन मला "हो" म्हणालीस
तीच तू मला पुन्हा नव्याने मिळालीस...
तीच तू मला पुन्हा नव्याने मिळालीस .......

बाकि सर्व ठीक

बाकी सर्व ठीक ...

सूर्याला डागांचा चंद्राला कलांचा
जगण्याला रीतीचा आणि मरणाला भीतीचा
एक फक्त शाप आहे
बाकी सर्व ठीक हि चक्क थाप आहे

परीक्षांना बाजाराचा रोग्यांना आजाराचा

शहरांना जागांचा अन खेड्यांना दादांचा
एक फक्त शाप आहे
बाकी सर्व ठीक .....

तरुणाईच्या अधीरतेचा नेत्यांच्या बधीरतेचा

खेळाडूंना बेटिंगचा अन कोर्टाला वेटिंगचा
एक फक्त शाप आहे
बाकी सर्व ठीक .....

धान्याला सडण्याचा शेअर मार्केटला पडण्याचा

रिक्षावाल्यांना नडण्याचा अन बसवाल्यांना अडण्याचा
एक फक्त शाप आहे
बाकी सर्व ठीक हि चक्क थाप आहे
बाकी सर्व ठीक हि चक्क थाप आहे

आठवणींच्या क्षितिजावर

आठवणींच्या क्षितिजावर

त्या तिथे क्षितिजावर चांदण्याचं गाव
रोज सकाळी माझ्या ओठी पहिलं तुझ नाव

मी चांदण्या मोजतामोजाता तुला शोधून पाहिलं
पूर्ण गावभर हिंडलो पण तुझंच घर राहील

खूपखूप फिरलो पण तू नाही दिसलीस
का कुणास ठाऊक पण तरीही जवळची वाटलीस

मग एक दिवस कळलं मला कि तू नव्हतीसच घरी
तू तर होतीस त्या गावातल्या चांदण्याची परी

तुझ्या त्या गावामध्ये मला का प्रवेश नाही
खर खर सांग माझं चुकलं का काही

तेवढ्यात कुठून एक ढग क्षितिजावरती येतो
चांदण्याचं ते गाव हलकेच मिठीत घेतो

पुसून टाकतो सर्व काही जातो स्वत: विरून
तुझ्या माझ्या सार्या जागा मी पाहतो पुन्हा फिरून

तू इथे नसलीस तरी तुझी आठवण येते खूप
भडभडणाऱ्या जखमेवरती तेवढाच साजूक तूप

-
विशाल आपटे