Wednesday, June 22, 2011

स्नुषा

स्नुषा

मोकळ्या केसांना मुक्त मानेवर रुळू दे

कपाळी कुंकू चार चौघांना कळू दे
पापण्यांचे पंख वर आकाशी उडू दे
क्षणाची उसंत तरी या डोळ्यांना मिळू दे

कोवळ्या उन्हात तू केस वाळवीत

उन्हाचे कवडसे थेट माझ्या दारात
केसांतून उडे पाणी भोवती हवेत
काय सांगू वेडे किती भिजलो मनात
मी तुला चोरून बघता हसशी गालात
नजरबंद मी उभा माझ्याच घरात

देवळास जाशी तू सकाळी दहास

वाटेतच उभा मी मुद्दाम चहास
घरातून देऊळ अवघ्या मिनिटांचा प्रवास
किती .... ओढ लागे माझ्या अधीर मनास

धीर करून मोठा तुला एकदा मी अडवले
मनातल्या स्पंदनाना शब्दांनी मढवले
स्वप्नांना अपेक्षांच्या खांद्यांवर चढवले
पण तुझ्या उत्तराने भर पावसात रडवले

पाऊस होता ते बरच झाल .....
पाऊस होता ते बरच झाल डोळ्यातलं पाणी मनातून व्हाल
घुसमट झाली विचारांची मन माझ मनातून भ्याल
माझ्या जीवाचे बघून हाल तुझ्या डोळ्यात पाणी का बर आल ?

नंतर एकदा दिसलीस दोन पावलं मागे हटलीस
तरीही मला तितकीच जवळची वाटलीस
अचानक जवळ येऊन मला "हो" म्हणालीस
तीच तू मला पुन्हा नव्याने मिळालीस...
तीच तू मला पुन्हा नव्याने मिळालीस .......

No comments: