Wednesday, June 22, 2011

बाकि सर्व ठीक

बाकी सर्व ठीक ...

सूर्याला डागांचा चंद्राला कलांचा
जगण्याला रीतीचा आणि मरणाला भीतीचा
एक फक्त शाप आहे
बाकी सर्व ठीक हि चक्क थाप आहे

परीक्षांना बाजाराचा रोग्यांना आजाराचा

शहरांना जागांचा अन खेड्यांना दादांचा
एक फक्त शाप आहे
बाकी सर्व ठीक .....

तरुणाईच्या अधीरतेचा नेत्यांच्या बधीरतेचा

खेळाडूंना बेटिंगचा अन कोर्टाला वेटिंगचा
एक फक्त शाप आहे
बाकी सर्व ठीक .....

धान्याला सडण्याचा शेअर मार्केटला पडण्याचा

रिक्षावाल्यांना नडण्याचा अन बसवाल्यांना अडण्याचा
एक फक्त शाप आहे
बाकी सर्व ठीक हि चक्क थाप आहे
बाकी सर्व ठीक हि चक्क थाप आहे

No comments: