Friday, November 30, 2012

तू ....

तू

आयुष्य उभे हिंदकळले तुझ्या आठवांत
माझ्या भरकटल्या शिडाला तुझा किनारा कशाला  ||

प्रगतीची दौड माझी झाली दिशाहीन
माझ्या यशाच्या घोड्याला तुझा खरारा कशाला ||

आता तुझ्या आठवांचे डंख झाले विषारी
माझ्यात भिनल्या या विषाला तुझा उतारा कशाला ||

रोज झोपी जातो मी ...
रोज झोपी जातो मी तुझी स्वप्ने घेऊन उराशी
माझ्या हक्काच्या स्वप्नांवर तुझा पहारा कशाला ||
माझ्या हक्काच्या स्वप्नांवर तुझा पहारा कशाला ||

विशाल आपटे (अवि)

बंद म्हणजे काय रे भाऊ ...



बंद म्हणजे मोडक्या बस, बंद म्हणजे जळक्या कार
कि बंद म्हणजे सत्याग्रह बंद म्हणजे असहकार
बंद म्हणजे गैरसोय बंद म्हणजे धावपळ
कि बंद म्हणजे असंतोष अन्यायाविरुद्ध चळवळ

बंद म्हणजे हट्ट, बंद म्हणजे अडवणूक
का बंद ला येतो जोम जेव्हा जवळ येते निवडणूक

बंद सरकार विरुद्ध विरोधी पक्षाचा
कि बंद अन्यायाविरुद्ध सामान्य माणसाचा
बंद म्हणजे डाव, बंद म्हणजे प्रतिडाव
बंद खर तर करतो कोण आणि कोणाचं होत नाव

बंद म्हणजे शस्त्र,  दुधारी,  रक्त सांडणारं
कि बंद खर तर अस्त्र जनतेचा कौल सांगणार

तेव्हा गड्यानो बंद करा, पण जपून,  समाजाच भान ठेऊन
नाहीतर जीव जायचा आपलाच  कायद्यान गळा दाबून

- विशाल आपटे