तू
आयुष्य उभे हिंदकळले तुझ्या आठवांत
माझ्या भरकटल्या शिडाला तुझा किनारा कशाला ||
प्रगतीची दौड माझी झाली दिशाहीन
माझ्या यशाच्या घोड्याला तुझा खरारा कशाला ||
आता तुझ्या आठवांचे डंख झाले विषारी
माझ्यात भिनल्या या विषाला तुझा उतारा कशाला ||
रोज झोपी जातो मी ...
रोज झोपी जातो मी तुझी स्वप्ने घेऊन उराशी
माझ्या हक्काच्या स्वप्नांवर तुझा पहारा कशाला ||

विशाल आपटे (अवि)