माझी अंत्ययात्रा
माझ्या अंत्ययात्रेत तशी बरी गर्दी जमली होती
आयुष्याची गोळाबेरीज शून्यावरती थांबली होती
जी तोंड कधी थकली नाहीत मला शिव्या घालताना
त्यातून शब्दच फुटत नव्हते मी नसल्याचे सांगताना
ज्या हातांनी टाळ्या दिल्या हर एक मैच जिंकताना
आज तेच हात कापत होते माझी तिरडी बांधताना
मी शेवटी कायमचा शांत निजलो
फुलांनी, हारांनी, अबीर - बुक्यांनी सजलो
आयुष्यभर ज्यांसाठी झीज झीज झिजलो
आज त्यांच्या अश्रूंनी आकंठ भिजलो
माझ्यातून आज मीच बाहेर पडलो
हातून झालेल्या चुकांसाठी रडरड रडलो
आता वेळ निघून गेली होती सार काही संपल होत
मरणाने आयुष्याला चहूकडून घेरल होत
एवढच काय तर नाक तोंड ही कणकेन डांबल होत
मन माझं शरीरापासून कायमच लांबल होत
काळाच चक्र फिरत असत कुणीतरी मागे उरत असत
किती पेक्षा कसा जगलो यातच सगळ ठरत असत
किती पेक्षा कसा जगलो यातच सगळ ठरत असत ...
- विशाल आपटे
फुलांनी, हारांनी, अबीर - बुक्यांनी सजलो
आयुष्यभर ज्यांसाठी झीज झीज झिजलो
आज त्यांच्या अश्रूंनी आकंठ भिजलो
माझ्यातून आज मीच बाहेर पडलो
हातून झालेल्या चुकांसाठी रडरड रडलो
आता वेळ निघून गेली होती सार काही संपल होत
मरणाने आयुष्याला चहूकडून घेरल होत
एवढच काय तर नाक तोंड ही कणकेन डांबल होत
मन माझं शरीरापासून कायमच लांबल होत
काळाच चक्र फिरत असत कुणीतरी मागे उरत असत
किती पेक्षा कसा जगलो यातच सगळ ठरत असत
किती पेक्षा कसा जगलो यातच सगळ ठरत असत ...
- विशाल आपटे